डी जे कोर्स मराठीतून: डिस्क जॉकी कसे बनाल?

, डी जे कोर्स मराठीतून: डिस्क जॉकी कसे बनाल?
Post CV 100% Free to the UAE!

We are free of charge but before you start please donate $5 to help others! Help us. Make a Difference.

Helping others is the first step in making the world a better place and improving the lives of those who aren’t as lucky as you. But it’s also shown to bring about a wealth of benefits for those who choose to help and might just be the key to happiness! We are helping all over the world.

, डी जे कोर्स मराठीतून: डिस्क जॉकी कसे बनाल?

रमेश, अकोल्यात राहणारा एक साधा मुलगा. लहानपणापासूनच त्याला संगीताची आवड होती. मोकळा वेळ मिळाला की तो जुनी, नवी, सर्व प्रकारची गाणी एकायचा. कॉलेजच्या शिक्षणासाठी जेंव्हा तो नागपूरला गेला, तेंव्हा कॉलेजच्या काही मित्रांमुळे त्याची पाश्चात्य संगीताशी ओळख झाली आणि त्याला त्यातील बरेच प्रकार आवडू लागले. एकदा मित्रांबरोबर तो एका क्लब मध्ये गेलेला असताना, त्याला तेथील एका विशिष्ठ व्यक्तीविषयी खूप कुतूहल वाटले. ती व्यक्ती म्हणजे साधारण त्याच्याच वयाचा एक तरुण होता. त्याच्यासमोर काही यंत्रे होती, एक लॅपटॉप होता, आणि तो सगळ्यांना आवडतील अशी गाणी लावत होता. मोठ्या शिताफीने तो गाणी मिक्स करत होता आणि श्रोत्यांना एका गाण्यातून दुसर्‍या गाण्यात नेत होता. त्या क्लब मध्ये आलेले सगळेच त्याच्यावर खुश होते आणि त्याने लावलेल्या गाण्यांचा सगळेच जण मनमुराद आनंद घेत होते. त्या दिवशी पहिल्यांदाच रमेशने एक डिस्क जॉकी पाहिला होता, आणि आपणही असंच काहीतरी करावं ही इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली होती.

तुम्हालाही डिस्क जॉकी (disk jockey) होण्याची इच्छा असेल, ह्या क्षेत्रात करियर करायचे असेल, तर सर्वात आधी डिस्क जॉकीचे कार्य काय असते (what does a disk jockey do) ते समजून घ्या, डिस्क जॉकी कसे बनाल (how to become a disk jockey) ह्याची सविस्तर माहिती घ्या आणि मगंच ठरवा, तुम्हाला डीजे (DJ) बनायचे आहे की नाही ते. ही सगळी माहिती आणि डीजे तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी तुम्ही डिस्क जॉकी कोर्स (disk jockey course) करू शकता. हा कोर्स तुम्ही ऑनलाइन (online disk jockey course) करू शकता.

डिस्क जॉकी (डी जे) म्हणजे कोण? (Who is a Disk Jockey?)

प्रेक्षकांना किंवा एखाद्या ठिकाणी जमलेल्या समुदायाला रेकोर्डेड संगीत एकवणारी व्यक्ती म्हणजे डिस्क जॉकी. ह्या संज्ञेतील डिस्क हा शब्द विनाईल रेकॉर्ड वरून आला, पण आजचा डीजे हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे संगीत एकवतो. डीजे हा तुम्हाला पार्टीज किंवा सोहळ्यांमधून पहायाला मिळतो, तसेच क्लब्स आणि पब्स मध्ये दिसतो.

काहीजण हे रेसिडेंट डीजेस (resident DJs) असतात, म्हणजेच, ते एखाद्या डिस्कोथेक किंवा क्लबमध्ये काम करतात. काही जण मोबाइल डीजे (mobile DJ) असतात, म्हणजे, त्यांना इवेंट्स मध्ये बोलावले जाते. रेडियो डीजे (radio DJ) म्हणजे रेडियो जॉकी हे रेडियो वरून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि त्यांना गाणी एकवतात. टर्नटेबलिस्ट्स (turntablists) हे संगीत मिक्स करतात किंवा नवीन संगीत तयार करतात, तसंच प्रोड्यूसर डीजे (producer DJ) रीमिक्स गाणी तयार करतात.

बर्‍याचदा प्रत्येक डीजेचा एका विशिष्ट संगीत प्रकाराकडे कल असतो, आणि त्या प्रकारातील संगीतावर तो जास्त काम करतो.

डिस्क जॉकी कसे बनाल? (How to become a Disk Jockey?)

डीजे होण्यासाठी कोणत्याही कॉलेज किंवा युनिवर्सिटीचा डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स नाही, त्यामुळे एखाद्या चांगल्या संस्थेचा डीजे कोर्स (DJ course) करणे पुरेसे असते. कोर्स करण्या इतकेच महत्वाचे आहे, स्वत: वेळ काढून साऊंड मिक्सिंग (sound mixing) आणि रीमिक्सचे (remix) तंत्र शिकणे व डीजेला लागणार्‍या सोफ्ट्वेयर्सचा (DJ softwares) अभ्यास करणे. तसेच चांगले आणि विविध प्रकारातील संगीत ऐकणे आणि अनेकविध शैलीतील गाण्यांचा संग्रह करणेही आवश्यक असते.

डीजेच्या प्रकारांची (types of DJ) माहिती घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला कोणता प्रकार निवडावा हे समजू शकेल. डीजेच्या कार्याची (work of a DJ) संपूर्ण माहिती घेणेही महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला नोकरी-व्यवसाय करताना काय काम करावे लागेल ह्याची कल्पना येईल.

जर तुम्ही साऊंड किंवा ऑडिओ इंजिनियरिंगची डिग्री (degree in sound or audio engineering) घेतलीत, तर तुम्हाला डीजेईंगचे तंत्र समजून घेणे सोपे होईल. तसेच, जर संगीताचे शिक्षण घेतलेत, तर तुमची लय-ताल आणि सुरांची समज वाढल्यामुळे, गाणी मिक्स करताना तुम्हाला ह्या शिक्षणाचा चांगला उपयोग होईल.

डीजेचा कोर्स तुम्हाला १०वी किंवा १२वी (DJ course after 10th or 12th) नंतर करता येतो, तसेच ग्रॅजुएशन नंतरही (DJ course after graduation) करता येतो. वर दिल्याप्रमाणे, डीजेयिंगचे शिक्षण कोणत्या कॉलेज मध्ये मिळत नाही पण अनेक उत्तम संस्था आज डीजे सारख्या तुलनेने नव्या क्षेत्रातील मार्गदर्शनपर कोर्सेस देत आहेत. डीजेचे सर्टिफाईड कोर्सेस (certified DJ courses) असतात, तसेच, डिप्लोमा कोर्सेस (diploma courses for DJ) असतात तर काही संस्था म्युसिक प्रॉडक्शनचे कोर्सेसही (music production courses) घेतात. डीजेच्या बेसिक किंवा फाऊंडेशन कोर्स (DJ basic or foundation course) पासून सुरुवात करून, पुढे तुम्ही स्पेशलाइज्ड कोर्स (specialized DJ course) करू शकता. ह्या कोर्सेसचा कालावधी १ महिन्या पासून ते १ वर्षापर्यंत असू शकतो, व कालावधी आणि कोर्सची व्याप्ती हयानुसार, डीजे कोर्सची फी (DJ course fee) बदलते.

डीजे कोर्स तुम्ही ऑनलाइन (online DJ course) पद्धतीने करू शकता. मराठी भाषिक किंवा ज्यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, त्यांना एखादा नवीन कोर्स जर इंग्रजीतून करायचा झाला तर भाषेची अडचण येते. ही अडचण समजून घेऊन काही संस्थांनी मराठीतून डीजे कोर्स (DJ course in marathi) देण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्थांमधील एक प्रमुख नाव म्हणजे छलांग.

छलांगसारखे प्लाट्फोर्म्स महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील छोट्या गावांमधल्या होतकरू मुलांना करियरच्या नव्या वाटा शोधता याव्या ह्यासाठी प्रयत्नशील आहेत. खेड्यात, लहान गावांत राहणार्‍या मुलांना अशा नवीन क्षेत्रांमध्ये नोकरी-व्यवसाय करता यावा ह्यासाठी ते झटत आहेत. म्हणूनच तुम्हाला जर डीजे होण्याची इच्छा असेल, तर त्यासाठीचा कोर्स करण्यासाठी छलांगची मदत घ्या. तुम्हाला तंत्र शिक्षण आणि डीजेच्या कार्याबद्दल (role of a DJ) माहिती तर मिळेलंच पण त्याचबरोबर, ह्या अनोख्या क्षेत्रात पदार्पण करण्याचा आत्मविश्वासही मिळेल हे नक्की.

त्यामुळे, संगीताकडे तुमचा कल असेल आणि लोकांचे मनोरंजन करण्याची तुम्हाला आवड असेल, तर डीजेईंग ही तुमच्यासाठी एक उत्तम करियर (career as a DJ) संधी ठरू शकते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments